|| विठ्ठला ||
सावळ रूप तुझे विठ्ठला, भावते रे ते मनाला,
ओढ तुझ्या भेटीची लागते जीवाला, चैनही पडत नाही पायाला ||
आस पंढरीच्या वारीची, मन धावे चंद्रभागेच्या तीरी,
तुझ्या दर्शनाच्या बारी, विठ्ठल विठ्ठल करतेय वारी ||
टाळ मृदुंगाचा नाद जगी, रिंगण रंगेतेय जागो जागी,
बाया बापुडे फेर धरी, तुझ्या नामाचा गजर करी ||
भागवत
धर्माची पताका घेउनी हाती, ग्यानबा
तुकाराम पालखी नाचती,
आभाळातून
आशिष बरसती, भजनात
वारकरी तल्लीन होती ||युगानु युगे उभा तू विटेवरी, विठ्ठल रखुमाईची पंढरी,
टेकता माथा तुझिया चरणी, जन्म हा लागतो सार्थकी ||
विठ्ठल
विठ्ठल जय हरी विठ्ठल, गजर
तुझा नामाचा आसमंत दुमदूमी ||
प्रतिबिंब काव्यसंग्रह.
No comments:
Post a Comment